मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार म्हणजेच भा रा भागवत.
फास्टर फेणे ही कथामाला १९८७ साली दूरदर्शनवर १३ भागांतून प्रसारीत करण्यात आली. १९५४ साली “चंद्रावर स्वारी” या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पहिला शिरोळे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९७५ साली आयोजित पहिल्या “बालकुमार साहित्य संमेलना”चे अध्यक्ष होण्याचा बहुमान भास्कर भागवत यांना मिळाला होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या गौरव पुरस्काराचे भागवत मानकरी असून, त्यांची बालवाड्:मयाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
भा रा भागवत यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार हे नायक १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले.
याखेरीज अनेक स्वतंत्र, तर त्याहून अधिक भाषांतरित पुस्तके लिहून कुमार वाचकांचे विश्व त्यांनी समृद्ध केेले.
(दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित)
भास्कर भागवत यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
## Bhaskar Ramchandra alias Bha Ra Bhagwat
Leave a Reply