विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

जे. एल. रानडे

१६ ऑक्टोबर १९५१ या दिवशीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकातील ‘संगीतसुधा’मध्ये नवीन रेकॉर्डस्च्या जाहिरातीत गायक जे. एल. रानडे यांच्या ‘घायाळ मी शिकारी’ व ‘डोळे तुझे शराबी’ या गीतांचा उल्लेख आहे. […]

जी. एन. जोशी

१९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. […]

जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर

जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲ‍काडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे. […]

जितेंद्र जोशी

सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात. […]

जयश्री तळपदे ऊर्फ जयश्री टी

दादा कोंडके, अमोल पालेकर, अशोक सराफ, यशवंत दत्त, अरुण सरनाईक अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी, हिंदीबरोबरच भोजपुरी, तमीळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आदी जवळपास अठरा भाषांतील चित्रपटांत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. […]

जयराम कुलकर्णी

लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. […]

चिंतामणी गोविंद पेंडसे ऊर्फ मामा पेंडसे

१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले. […]

चंद्रकला कदम

एक महिला असूनही चंद्रकला कदम या बेधडकपणे गुन्हेगारी जगतातील संशयितांना पकडण्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून गुन्हेगारांची हुबेहूब रेखाचित्रे रेखाटून आपली कला समाजकार्य म्हणून जोपासत आहेत. काही गुन्ह्यांतील संशयित गुन्हेगारांची रेखाचित्रे काढून त्यांना यशस्वीरीत्या पकडून देण्यामध्ये चंद्रकला कदम यांच्या रेखाचित्रांची आजवर पोलिसांना पुरेपूर मदत मिळाली आहे. […]

गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. […]

1 10 11 12 13 14 54