विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली. मनोज कुमार यांच्या शहिद या चित्रपटातील राजगुरू यांची भूमिका व हमारी याद आयेगी या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली होती. […]
स्टार प्रवाह वरील “लक्ष्य” या मालिकेतील सलोनी देशमुख भूमिकेनी त्यांना खुप प्रसिद्धि मिळवून दिली. […]
वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत. […]
अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं. […]
दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला. […]
“सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली हा अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला. […]
१९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली. […]
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. […]
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. […]
ख्याल गायिकी आणि भजनगायनासाठी त्या ओळखल्या जात होत्या. संगीताबरोबरच संस्कृत आणि इंग्रजीतील पदवीही कानपूर विद्यापीठातून प्राप्त केली होती. त्यानंतर ‘संगीत अलंकार’ ही पदवी मिळविली होती. […]