विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

संगीतकार अवधूत गुप्ते

नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. त्यानंतर ‘सारेगपम’ या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही ते गाजले. […]

अरुण पौडवाल

प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पिलाहिरी ,आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत […]

अरूण दाते

लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही. […]

एन. दत्ता (दत्ता नाईक)

एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ […]

अनंत माने

वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते. […]

उर्मिला कानेटकर कोठारे

‘मला आई व्हायचंय’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातून घराघरात ओळखली जाणारी प्रतिभावंत अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर. तिचा जन्म ४ मे १९८६ रोजी पुणे येथे झाला. उर्मिला ही एक उत्तम अभिनेत्री आहे सर्वांना माहित आहे मात्र ती एक उत्तम क्लासिकल […]

अजय सरपोतदार

टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठीबरोबरच प्रादेशिक […]

अच्युत केशव अभ्यंकर

अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.
[…]

अभिनेत्री नयना आपटे

नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी ‘पुण्यप्रभाव’ या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास […]

चंदू पारखी

उत्तम शाब्दिक विनोद, बहारदार शाब्दिक कोट्या, दर्जेदार मुद्राभिनय, स्लपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातीत लवचिकता, हजरजबाबीपणा व अफाट टायमिंग सेन्स! चंदू पारखी हे महान विनोदवीरच होते. चंदू पारखी यांनी अनेक नाटक व चित्रपटातून भूमिका केल्या. माझा […]

1 23 24 25 26 27 54