विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

किशोर कदम उर्फ कवी सौमित्र

काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले […]

बॉलिवूड दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर

आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे त्यांनी ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी […]

आनंद भाटे

आनंद भाटे हे पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य. संगीत नाटकांतील नाटय़पदे आणि अभिनयामुळे मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे बालगंधर्व आणि शास्त्रीय संगीताबरोबरच संतवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांवर आपल्या आवाजाचे गारुड करणारे पं. भीमसेन जोशी या दोघांचीही गायनशैली […]

अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक आत्माराम भेंडे

सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि […]

जिंगल्सचा राजा, संगीतकार अशोक पत्की

पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) […]

अमृता सुभाष

अमृता सुभाष कुलकर्णी म्हणजेच अमृता सुभाष हिने चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणारी अभिनेत्री आहे, यासोबतच लेखिका, गायिका आणि संगीतकार म्हणून देखील तीने काम केले आहे.. तिचा जन्म १३ मे रोजी झाला. अमृता […]

दानवे, जयशंकर

जयशंकर दानवे हे खलनायक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. […]

साटम, शिवाजी

शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील आघाडीचे अभिनेते आहेत. सी आय डी या हिंदी मालिकेमुळे ते गेली अनेक वर्षे अक्षरशः घराघरात पोहोचले आहेत.

श्रीकांत ठाकरे

श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले. […]

राम नगरकर

‘रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते. […]

1 24 25 26 27 28 54