विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
अजिंठा-वेरुळचा कलाकार अशी आपल्या कलेची ओळख जगभर आपल्या कामातून पटवून देणारे शिल्पकार सुनील देवरे यांनी पौराणिक ते आधुनिक काळ असा मोठा पट आपल्या शिल्पाकृतींमधून साकारला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच मोठ्या प्रकल्पांसाठी शिल्पकार देवरे यांनी […]
चित्रपटाच्या आर्थिक गणितांपासून अलिप्त राहून अभिव्यक्तीला प्राधान्य देणार्या गौरी पटवर्धन यांनी सातत्याने वेगळे काम केले आहे. ‘मोदीखानाच्या दोन गोष्टी’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या माहितीपटातून त्यांनी वेगळा विचार मांडला आहे. गौरी पटवर्धन यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद […]
अरुण शंकरराव सरनाईक (४ ऑक्टोबर, इ.स. १९३५[१] – १४ मार्च इ.स. १९९८) हा मराठी चित्रपट-अभिनेता होता. त्याने मराठी चित्रपट व नाटकांतून अभिनय केला. इ.स. १९६१ सालच्या शाहीर परशुराम या चित्रपटातील पूरक भूमिकेद्वारे त्याने चित्रपटसॄष्टीत पदार्पण […]
सरस्वतीबाई राणे ऊर्फ सकीना यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी मिरज येथे ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. सरस्वतीबाई राणे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. हिंदुस्तानी शास्त्रीय […]
त्यांनी एकंदर अकरा नाटके लिहिली. त्यांचे कटयार काळजात घुसली‘ हे संगीत नाटक त्यातील नाटयगीतांमुळे खूपच गाजले आणि एकंदरच नाटककार म्हणून ‘दारव्हेकर श्रेष्ठच होते. पंरतु लोकांना जास्त भावले ते दिग्दर्शक पुरुषोत्तम दरव्हेकर यांची पावती म्हणजे वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले‘ हे नाटक त्यांनी दिग्दर्शित केले आणि कायम लोकांच्या स्मरणात राहिले. त्यांनंतर वि. वा. शिरवाडकर यांचे ‘नटसम्राट‘ हे नाटक नाटयसंपदातर्फे रंगभूमीवर आले या नाटकाचे दिग्दर्शनसुध्दा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनीच केले होते. […]
रंग व रंगलेपन हा त्यांच्या चित्रातील प्रमुख घटक राहिला. ‘रोलर‘ किंवा ‘पेंटिग नाइफ‘चा वापर करणार्या गायतोंडेनी मात्र तंत्राला अती महत्व दिलं नाही. रंगांचाही ते मर्यादित वापर करीत. रंग विलेपनातून पृष्ठभागावर विविध प्रस्तर निर्माण करुन अवकाशाच्या विविध खोलींचा भास निर्माण करणं, हे त्यांच्या चित्रकृतीचं ठळक वैशिष्टय ठरलं. […]
कुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं. […]
पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव यांचा बडोदे येथे ९ मार्च १८६३ रोजी जन्म झाला. बापूबोवा कोल्हटकर हे त्यांचे पिता व सौ. भागीरथीबाई ही माता. भाऊरावांचे शिक्षण कारकुनी करण्यापुरते झाले […]
महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या […]
१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील “सैरंध्री” या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या. भालजींच्या “महारथी कर्ण” व “वाल्मिकी” या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रुपांतर विवाहत झाले व लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या. […]