विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
विनोदाची झालर व हास्याचे कल्लोळ तसंच आपल्या कवितांमधून रसिकांना अंतर्मुख करायला लावणारे कवी म्हणजे शंकर दत्तात्रय भोसले हे होते. “बाहेरचा वारा”, “गालावरचे गुलाब”, “जवानीचे विमान”, “स्वप्नातील चुंबन”, “चटक चांदण्या” अश्या अनेक विनोदी, संवादात्मक, व मिश्कील […]
विसाव्या शतकातील भारतातील प्रतिभावंत व राष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांमध्ये त्यांचा आवर्जुन उल्लेख केला जातो त्यापैकी मुख्य नाव म्हणजे नारायण श्रीधर बेंद्रे यांच. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१० रोजी इंदोरमध्ये झाला. चिनी चित्रकलेपासून ते आदिम कलेपर्यंत, अशा […]
मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर […]
ठाण्यामधील व्यासंगी विद्वानांपैकी घेतले जाणारे नाव म्हणजे शंकर बाळकृष्ण दिक्षीत हे ज्योतिषशास्त्राच्या विविध पैलुंवरील त्यांचा आभ्यास परिपूर्ण पध्दतीचा होता. भारतीय प्राचीन ज्योतिषशास्त्राला मिळालेली अचूकतेची व परिपक्वतेची किर्ती, ही ग्रीसमधील किंवा इतर परकीय ज्योतिषशास्त्रांच्या मुलतत्वांचे अनुकरण […]
यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. […]
ज्या काळात स्त्रीयांनी कलेच्या क्षेत्रात विशेषत: नाटक व चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी बोलपटांमध्ये सुध्दा अर्थात १९३०च्या दशकात, पण अश्यावेळी काही महिला कलाकारांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचे धाडस दाखवले त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री लीला चिटणीस […]
रसिकांना आपल्या पहाडी तसंच खणखणीत स्वरांनी संगीतानुभव देणार्या चंद्रशेखर गाडगीळ यांचा जन्म पुण्याचा. लहानपणापासूनच राकट पण तितकाच श्रवणीय आवाज लाभलेल्या चंद्रशेखर गाडगीळ यांचे त्याकाळी बालगंधर्व यांनी भरभरुन कौतुक केले होते. पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, […]
झी मराठी वाहिनीवरील जय मल्हार या पौराणिक मालिकेत खंडोबाच्या दरबारातील “हेगडी प्रधान” या महत्त्वपूर्ण व्यक्तीरेखेची भुमिका साकारणाची संधी अतुल अभ्यंकर यांना मिळाली होती. त्यांच्या दमदार अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळाली होती. झी मराठी अॅवॉर्डस २०१४ मध्ये अतुल अभ्यंकर यांना “सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेच्या पुरस्कारा”ने सन्मानित देखील करण्यात आले होते.
[…]
मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पाश्र्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले.
[…]
कौशल इनामदार यांनी मराठीच नाहीतर अनेक हिंदी शॉर्ट फिल्मनाही संगीत दिलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत “बालगंधर्व”, “अजिंठा”, ‘कृष्णा काठची मीरा’, ‘आग’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘अधांतरी’, ‘रास्ता रोको’, ‘इट्स ब्रेकींग न्युज’ आणि ‘हंगामा’ या चित्रपटांना संगीत दिलं आहे. […]