विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
मराठी चित्रपटांमधली यशस्वी “वुमन फिल्ममेकर” तसंच प्रतिभावान व संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ साली दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली. […]
तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या
चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
[…]
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.
[…]
मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.
[…]
वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. […]
धोंडुताईंनी वयाच्या पाचव्या वर्षांपासूनच आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने संगीताचे शिक्षण सुरू केले होते.शिक्षणकाळातील कठोर आणि खडतर साधनेमुळे धोंडुताईंना अल्पावधीतच अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत आपली गायनकला सादर करण्याची संधी मिळाली.
[…]
अनेक कलाकारांना आपल्या कॅमेर्याद्वारे ग्लॅमर प्राप्त करून देणारे ज्येष्ठ सिनेछायाचित्रकार जगदीश माळी यांनी एका चित्रपटविषयक मासिकापासूनक आपल्या फोटोग्राफीच्या कारकीर्दीला सुरवात केली.अभिनेत्री रेखाचे ते आवडते फोटोग्राफर होते. व त्या केव्हाही आणि कधीपण जगदीश माळी यांच्याकडूनच फोटो काढून घेत असे.जगदीश माळींनी अनेक जाहिराती आणि म्युझिक व्हिडिओसाठी काम केले होते.
[…]
शिक्षण बी.कॉम., गेली २० वर्षे संगीतात कार्यरत, पु.ल. देशपांडे ह्यांच्या हस्ते मानपत्र, ई.टी.व्ही./झी.टी.व्ही./सह्याद्री/साम/दूरदर्शन/आकाशवाणी वर गायनाचे कार्यक्रम.
[…]
चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.
[…]
ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्या खअरकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे.
[…]