विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

प्रधान, रोहित अरविंद

साऊंड रेकॉर्डिंग व मिक्सिंग मध्ये ७ वर्षांचा अनुभव, चित्रपट, सिरियल्स आणि म्युझिक अल्बमचे काम केले आहे. म्युझिक प्रॉडक्शन मध्ये इंग्लंड मध्ये जाऊन मास्टर्स डिग्री मिळवली.
[…]

गायतोंडे, सुरेश भास्कर

अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय.
[…]

गोडबोले, वरदा संदेश

ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. संगीतभूषण राम मराठे यांसारखे ज्येष्ठ गायक याच ठाण्यातले. त्यांच्या पासून सुरु झालेली ही परंपरा आज अभिमान वाटावी इतकी उच्च दर्जाची झाली आहे. […]

राजवाडे, विनय नारायण

संगीतकार तसेच गायक म्हणून प्रसिद्ध असलेले विनय राजवाडे हे ठाणेकर आहेत व आजच्या आणि उद्याच्या ठाण्याबद्दलच्या त्यांच्या कल्पना ह्या अगदी साध्या परंतु महत्वाच्या आहेत.
[…]

तेलवणे, किशोर गौरीनाथ

ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.
[…]

माने, विजू गोपाळ

प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणजे ठाणे शहरातल्या शिरपेचातला आणखी एक हिरा. नाटकामधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या माने यांनी नंतर गोजिरी, ती रात्र यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी लेखक म्हणूनही काम केले. 
[…]

खाडे, लहू (काळू)

लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.
[…]

यशवंत दत्त (यशवंतसिंह महाडीक)

अभिनेते यशवंत दत्त यांना खर्‍या अर्थाने नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा” या नाटकाने! या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. […]

सुलोचनाबाई

सुलोचनाबाईंनी २५० पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या तसंच सुमारे १५० हिंदी चित्रपटांमधुन चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत. […]

1 30 31 32 33 34 54