विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

तळाशीकर, सागर शशिकांत

बी.कॉम., एल.एल.बी. गोल्ड मेडलिस्ट असलेल्या, गेली वीस वर्षं नाटक, सिनेमा आणि मालिकेत झळकणारा एक सोज्ज्वळ, सालस तरीही गंभीर असा चेहरा म्हणजे सागर तळाशीकर.
[…]

समीरा गुजर-जोशी

मराठी मालिका आणि सन्मान सोहळ्यात दिसणारा एक चेहरा आपणा सर्वांच्याच ओळखीचा आहे. आपल्या निवेदनाने आणि अभिनयाने तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेतील प्रभुत्वामुळे सर्व श्रोत्यांना भुरळ घालणारी समीरा गुजर-जोशी ही देखील ठाण्यातलं एक रत्नच!
[…]

जोगळेकर-कुलकर्णी, संपदा

मुंबई विद्यापीठातून एम.ए. ही पदवी संपादित केलेल्या संपदा जोगळेकर ह्या सध्या पुणे विद्यापीठात पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी आपले शिक्षण मो.ह. विद्यालय व जोशी बेडेकर महाविद्यालय येथून पूर्ण केले. संपदा जोगळेकर यांनी आजपर्यंत १५ दूरदर्शन मालिका, पाच दैनंदिन मालिकातसेच “शर्यत”व “उदय” या दोन चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. […]

बोरकर, संजय लक्ष्मण

अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. […]

फडके, सुभाष दत्तात्रय

नाट्य – सिने क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अजोड कामगिरी करुन दाखविणारे लेखक, दिग्दर्शक सुभाष फडके हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. ३० ते ३५ वर्षं चित्रपट क्षेत्रात लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
[…]

गोडसे, सुनील

गडकरी रंगायतन हे ठाण्यातील एका नव्या पर्वाची नांदीच ठरलं. कारण रंगायतन झाल्यानंतर ठाण्यातील अभिनयाला एक मंच मिळाला आणि रंगायतनच्या कट्ट्यावर नाट्यसृष्टीला योगदान देणारे कलावंत मोठे होऊ लागले. त्यातलाच एक कलाकार म्हणजे “सुनिल गोडसे”!
[…]

प्रवीण अनंत दवणे

अशा हृदयातून ऐकणार्‍या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !
[…]

लाटकर, शिरीष दत्तात्रय

“पवित्र रिश्ता”, “बडे अच्छे लगते है”, सहित सहा हिंदी आणि अठरा मराठी मालिकांचे लेखन करणारे गिरीष लाटकर हे ठाण्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व. ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूल आणि त्यानंतर बेडेकर महाविद्यालयातून लाटकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच एकांकिका स्पर्धांतून अभिनेता म्हणून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले. 
[…]

काशीकर, सुनीती अरविंद

आपल्या मनातील ठाण्याविषयी सौ. सुनिती काशीकर अगदी मन मोकळेपणाने बोलतात. त्या म्हणतात की, त्यांच्या जन्मापासूनच ठाणे अनुभवलं आहे. पूर्वीचं ठाणं हे तलावाचं ठाणं, वेड्यांचं हॉस्पिटल असलेलं ठाणे म्हणून ओळखलं जाई. आजचं ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं एक महानगर म्हणून ओळखलं जात आहे. 
[…]

मेहेत्रे, विवेक

वयाच्या सोळाच्या वर्षांपासून व्यंगचित्रकलेला सुरुवात करणारे आणि बी.इ., एम.इ. व एम.बी.ए. असे शिक्षण घेतलेले लेखक विवेक मेहेत्रे सर्वच ठाणेकरांना परिचित आहेत.
[…]

1 33 34 35 36 37 54