विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

रामचंद्र नरहर चितळकर (सी.रामचंद्र)

हिंदी तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीत दिग्दर्शक व पार्श्वगायक असलेल्या सी.रामचंद्र यांचे मूळ नाव रामचंद्र नरहर चितळकर. ‘सी. रामचंद्र’ हे संक्षिप्त नाव त्यांनी सिनेदिग्दर्शक जयंत देसाई ह्यांच्या सूचनेवरुन धारण केले. आपल्या निकटवर्तीय व आप्तेइष्टांमध्ये ते ‘अण्णा’ या नावाने प्रसिद्घ होते.
[…]

कदम, राम

मराठी लावणीचे लावण्य खुलवून रामभाऊंनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. जुन्या झिलला उजाळा दिला, नवं रूप दिलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली त्यांनी अभिमानाने मिरवली. 
[…]

नंदा ऊर्फ कर्नाटकी, रेणुका विनायक

नंदा या सुप्रसिध्द सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि नट मास्टर विनायकांची कन्या. लहानपणी बेबी नंदा या नावाने १९४६ रोजी प्रथम बालकलाकार म्हणून “मंदिर” या चित्रपटातनं एका मुलाची भूमिका साकारली व त्यानंतर १५ ते १६ चित्रपटांमधुन काम केले.
[…]

सुधीर मोघे

निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची अनोखी शैली होती. पण त्यांची आणखीन एक ओळख महाराष्ट्राला होती ती म्हणजे प्रतिभावान साहित्यिक म्हणून; कविता, गीतकार, ललितकार, पटकथा -संवाद लेखक,गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, या क्षेत्रात संचार होता.
[…]

फाटक, नानासाहेब

फाटक यांनी “रक्षाबंधन” या नाटकातून नाट्यक्षेत्रात प्रेवश केला.या नाटकातील त्यांची गिरीधराची भूमिका खुपच गाजली होती. त्यानंतर त्यांना प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका केल्या. “पुण्यप्रभाव”, ‘श्री’, “सोन्याचा कळस”,“बेबंदशाही” अशा नाटकांमधून विविधांगी व्यक्तीरेखा साकारत रसिक मनांवकेफाटकांनी अधिराज्य केले.
[…]

पाटील, गणपत

चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय केला.जयशंकर दानवे यांच्या “ऐका हो ऐका” या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात सोंगाड्याची म्हणजेच ’नाच्या’ची भूमिका त्यांनी लीलया साकारली. गणपत पाटील यांच्या जबरदस्त अभिनयामुळे ही भूमिका खुपच लोकप्रिय झाली.“जाळीमंदी पिकली करवंदं” या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली होती.
[…]

मराठे, उषा (उषाकिरण)

उषा मराठे हे मूळ नाव असणार्‍या उषाकिरण यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताची होती. उषाकिरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकांत काम करण्यासाठी पाठवावयाचे ठरवले. […]

श्रीनिवास खळे

सुप्रसिध्द मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी बडोदा येथे झाला होता;खळे यांनी भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ संगीतमोहिनी घातली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर श्रीनिवास खळेंनी मुंबई गाठली. पण त्यांना काम मिळेना.
[…]

जहागीरदार, गजानन

२ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे जन्मलेले गजानन जहागीरदार हे मराठी व हिंदी भाषेतील चित्रपट-अभिनेते व दिग्दर्शक होते.
[…]

पवार, कुलदीप

मराठी चित्रपट, नाटक तसेच दूरचित्रवाणी वरील भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तीमत्व लाभलेल्या तसंच चरित्र व खलनायक अश्या विविधां व्यक्तीरेखा साकारणारे ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते कुलदीप पवार यांचा जन्म २४ डिसेंबर १९४९ सालचा. कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यां
[…]

1 36 37 38 39 40 54