विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

मास्टर दत्ताराम

मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. […]

मास्टर अविनाश

शारदा, उग्रमंगल, भावबंधन, राजसंन्यास, संन्यस्त खड्ग, ब्रह्मकुमारी इ. नाटकातील त्यांच्या भूमिका रसिकांना पसंत पडल्या. दीनानाथांच्या सहवासात आणि त्यांच्याकडून मिळालेल्या संगीत शिक्षणाने गणपतरावांची कला बहरली. […]

मालती पांडे बर्वे

‘खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली. […]

माधुरी दीक्षित

माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती. […]

माधवी गोगटे

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती. […]

माणिक वर्मा

क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. […]

महेश मांजरेकर

महेश मांजरेकर यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. […]

महेश काळे

कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. […]

संतोष जुवेकर

संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित “झेंडा” या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये “जब मिले छोरा छोरी” आणि “पोलिस लाइन” या चित्रपटाचा समावेश आहे. […]

ममता कुलकर्णी

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपल्या सौदर्याच्या अदांनी घायाळ करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. […]

1 2 3 4 5 6 54