विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

ठाकरे, उद्धव

महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक आणि सर्वाधिक लोकाधार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख
[…]

गोखले, कमलाबाई

भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्‍या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती.
[…]

आमोणकर, किशोरी

आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्‍या शास्त्रीय गायकांमध्ये किशोरी अमोणकरांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं….
[…]

गोखले-रुस्तम, भारती

सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा. […]

सप्रे, उदय गंगाधर

उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्‍या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.
[…]

पारखी, प्रतिक

प्रतिक पारखी हा तरूण पुण्याचा रहिवासी असून कला, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा व्यावसायिक आहे. ‘ओव्हेशन क्रिएशन’ ह्या सर्वा प्रकारच्या व आशयांवरच्या दृष्यफितींना सराईतपणे कात्री लावून त्यांच व्यावसायिक एडिटींग करून देणार्‍या लोकप्रिय स्टुडिओचा, समान भागीदार आहे. ऑगस्ट 2009 पासून सुरू झालेला हा स्टुडियो आजवरच्या त्याच्या सर्वात यशस्वी व फायदेशीर जागेवर उभा आहे, व याचं सारं श्रेय जातं ते उत्तुंग प्रतिभेचं व कल्पनाशक्तीचं, अत्यावश्यक भांडवल या स्टुडियोला एकहाती पुरविणार्‍या प्रतिकला.
[…]

धर्माधिकारी, निपुण

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, दर्जेदार व उद्योन्मुख तरूण दिग्दर्शकांच्या लांबलचक यादीमध्ये निपुण धर्माधिकारीचा क्रमांक नेहमी अव्वल असायचा. […]

यज्ञोपावित, किरण

किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.
[…]

झारेकर, पंकज

निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली.
[…]

पंडीत, वेधस

वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला. […]

1 41 42 43 44 45 54