विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

जोग, अमेय

अमेय जोग हे मराठी संगीतपटलावर चमचमणार्‍या युवा तार्‍यांपैकी एक आघाडीच नाव असून तो प्रसिध्द व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचा सुपुत्र आहे. सारेगम या झी मराठी वरील कार्यक्रमातून असंख्य रसिकांच्या मनावर मोहिनी घालण्यात यशस्वी ठरलेल्या अमेयने आजगायत मराठी शास्त्रीय रागांपासून ते नवीन युगाचे व तरूणाईचे प्रतिनिधीत्व करणार्‍या भावगीतं व रॉक गाण्यांपर्यन्त सर्वच गायनप्रकारांना सारख्याच तन्मयतेने व सचोटीने न्याय दिला आहे व पुण्या मुंबईमध्ये चाललेल्या बहुतांशी सांस्कृतिक संवर्धक गायन कार्यक्रमांमध्ये आपल्या सुरेल व गोड गळ्याचे प्रतिबिंब, उपस्थितांवर पाडणारी गाणी म्हणायला त्याला आवर्जुन आमंत्रित केले जाते.
[…]

दादरकर, अद्वैत

अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत. […]

बर्वे, रघुनंदन

रघुनंदन बर्वे हे सर्वपरिचीत व कौशल्यवान लेखक, दिग्दर्शक, एडिटर, व फ्री लान्सींग करणारे कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल योगदान समाजाच्या विवीध स्तरांमधुन वाखाणलं गेलेलं आहे. झी टॉकिज सारख्या प्रतिष्ठीत चित्रपट निर्माण कंपनीमध्ये कायमस्वरुपी, लेखक व दिग्दर्शक रुजु झालेल्या रघुनंदनने त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उत्तम फायदा मिळवला आहे. मराठी व्यासपीठ गाजवलेल्या व सर्वसामान्य रसिकांच्या हृद्यास स्पर्शुन गेलेल्या अनेक मालिकांची, चित्रपटांची व म्युझिक अल्बम्सची लांबलचक यादी त्याच्या सफाईदार दिग्दर्शनाखाली तावुन सुलाखून निघालेली आहे.
[…]

फुलफगर, योगेश

योगेश फुलफगर यांचा जन्म जानेवारी 18, 1985 मध्ये पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली.
[…]

अंबाळे, नितीन

नितीन अंबाळे हा 28 वर्षीय तरूण, मराठी रंगभुमिवरील विवीध प्रकारांना स्पर्श करून आलेला अष्टपैलु कलाकार आहे. दिग्दर्शन, स्क्रीन प्ले, अभिनय, कथालेखन, संहितालेखन अशा सर्व प्रकारामध्ये त्याने असामान्य कौशल्य व अनुभव प्राप्त केला आहे.
[…]

आहिरे, संकेत

संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.
[…]

तिखे, विरेंद्र

विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्‍यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.
[…]

कुकडे, गोपी

श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व. जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली.
[…]

रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व)

ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर. […]

कूर्डीकर, मोगूबाई

स्व.मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल.
[…]

1 42 43 44 45 46 54