विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
[…]
रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.
[…]
राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.
[…]
अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
[…]
नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं. […]
किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.
[…]
दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच. […]
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
[…]
जे. जे. स्कुलमधील शिल्पकला व मॉडेलिंग ची जी. डी. आर्ट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर शहरात अतिशय चांगल्या संधी व मान उपलब्ध असूनसुध्दा गुंजीससारख्या लहानशा खेड्यात शहरी झगमाटापासून व गजबजाटापासून अगदी दूर आपल्या शिल्पकलेचा कारखाना सुरू करणारे व हिरव्यागर्द निसर्गाच्या व विविध पशुपक्ष्यांच्या सानिध्यात आपल्या शिल्पांना बोलत करणारे हाडाचे कलाकार म्हणजे श्री गजानन कुडतरकर.
[…]
प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो. […]