विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

देशमुख, प्राजक्त

ते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
[…]

होर्णेकर, अरूण

कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते
[…]

जगताप-वराडकर, मिताली

रंगभूमी, दूरचित्रवाणी, जाहिराती, रुपेरी पडदा अशा विविवध माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून थेट राष्ट्रीय पुरस्कारावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळवणारी अष्टपैलू अभिनेत्री मिताली जगताप वराडकर.
[…]

पटवर्धन, चारुशीला

फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्‍याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.
[…]

ललिता सुधीर फडके

एक सुप्रसिद्ध मराठी गायिका. मात्र सूर्यापुढे तारका फिक्या पडतात तसेच काहीसे ललिता फडके यांचं झालं. सुप्रसिद्ध गायक व संगीतकार सुधीर फडके यांच्या त्या पत्नी. आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई. मात्र ही त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.
[…]

सुधीर फडके

सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे. […]

श्रीधर सुधीर फडके

श्रीधर फडके हे ख्यातनाम मराठी संगीतकार आणि गायक आहेत. ख्यातनाम गायक व संगीतकार स्व. सुधीर फडके आणि ख्यातनाम गायिका स्व. ललिता फडके यांचे ते सुपुत्र. श्रीधर फडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे.
[…]

तिवाडी, चंदाबाई

संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
[…]

1 44 45 46 47 48 54