विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

चव्हाण, जयसिंग

नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
[…]

मशे, जिव्या सोमा

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे
[…]

वढावकर, आप्पा

नाट्य-सिनेसृष्टीमध्ये वढावकर हे आडनाव नवं नाही. आधी राम वढावकर यांच्या निमित्ताने त्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांचे पुत्र उज्ज्वल तथा आप्पा वढावकर यांनी ही जबाबदारी नेटाने आणि कौशल्याने पुढे नेली. […]

फाळके, धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके

भारतातला क्रमांक एकचा उद्योग म्हणजेच चित्रपट निर्मितीचा – या चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली १९१३ रोजी “राजा हरिशचंद्र” या पहिल्या मुक पटापासून. खर्‍या अर्थानं हा भारताचा पहिला चित्रपट होय. या पहिल्या चित्रपटाचे निर्माते, आणि जनक म्हणून ओळखले जाणारे “धुंडिराज गोविंद फाळके” उर्फ दादासाहेब फाळके. […]

भार्गवराम विठ्ठल उर्फ मामा वरेरकर

इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. पांतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर, १९१८ रोजी प्रथम आलेले ‘हाच मुलाचा बाप’ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. […]

अशोक सराफ

मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत..
[…]

1 45 46 47 48 49 54