विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
तेजस्वी, पल्लेदार, धारदार आवाज, सूरनळ्यातून रंगीबेरंभी स्फुल्लिग उडून यावे अशाप्रकारे गळयातून बाहेर पडणार्या ताज्या सुंदर, ढंगदार चिजा, ठुमर्या, दादरे या गायकीच्या गुणांबरोबरच आवाजातील उंची, रूंदी, जोर या गुणांचे मिश्रण ज्यांच्या आवाजात आढळत असे, ते ज्येष्ठ श्रेष्ठ गायक दीनानाथ गणेश मंगेशकर. दीनानाथांचा जन्म गोमांतकातील मंगेशी या गावी २९ डिसेंबर १९०० रोजी झाला.
[…]
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. यांचे मूळनाव गणेश गोविंद बोडस. गणपतरावांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला.
[…]
‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
[…]
बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.
[…]
अद्वितीय प्रतिभा व शब्दप्रभुत्वाच्या साहाय्याने गीतरामायणा सारखा दर्जेदार नजराणा महाराष्ट्राला पेश करणारे व आजही मराठी रसिकांच्या मनांत अढळ स्थान असलेले श्रेष्ठ कवी! […]
व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट. व्ही. शांताराम यांचे पूर्ण नांव शांताराम वणकुद्रे. वयाच्या १९ व्या वर्षीच ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले.
[…]
ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फत्त* माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. […]
आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.
[…]
महाराष्ट्राचे ‘लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे आनंदयात्री’, ‘महाराष्ट्राचे भूषण’, ‘महाराष्ट्राचा अष्टपैलू कलावंत’ असा महाराष्ट्राचा अभिमान असणारे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.
[…]
मंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला. […]