विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्या….. ६४ कलांची पुजा करणार्या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…
शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती.
[…]
अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता. […]