विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

बापूराव पेंढारकर

व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते. […]

बापू लिमये

बापूंना हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवावासा वाटायचा. केवळ इतिहासच नव्हे तर नेपथ्याचे तंत्र आणि मंत्र नव्या रंगकर्मींना सांगावेसे वाटत. त्यांनी ‘गोष्ट नेपथ्याची’ हे तीन भागांतले पुस्तक लिहिले. […]

बबनराव नावडीकर

बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. […]

फय्याज शेख

प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते. […]

प्रा. बा. र. देवधर

संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत. […]

प्रसाद ओक

एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. […]

प्रवीण तरडे

अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या. […]

प्रमिला दातार

प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले. […]

प्रभाकर वाडेकर

चारुहास पंडित यांची चित्रे आणि प्रभाकर वाडेकर यांची कथा यातून साकारणारा चिंटू दैनिक सकाळमधून दररोज भेटीला यायचा. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी आणि चारूहास पंडित यांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली. […]

प्रभाकर बरवे

बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला! […]

1 5 6 7 8 9 54