विविध कला क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या….. ६४ कलांची पुजा करणार्‍या महाराष्ट्रातील बहुरंगी, बहुढंगी कलाकारांची ओळख तुम्हाला इकडे होईल…

प्रभाकर पेंढारकर

प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली. […]

प्रभाकर पंडित

मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले. […]

प्रभाकर जोग

एस.पी. कोलेजच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोगांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. […]

प्रफुल्ला डहाणूकर

फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. […]

प्रदीप कबरे

कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे. […]

प्रकाश घांग्रेकर

प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले. देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली. […]

पुष्पा पागधरे

त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या. […]

पुरुषोत्तम श्रीपत काळे

पुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे. […]

पिराजी रामजी सरनाईक

पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले. […]

पार्श्वनाथ यशवंत आळतेकर (अळतेकर)

रंगभूमीवरील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी),‘बापूसाहेब’ (रंभा) वगैरेंचा उल्लेख करता येईल. […]

1 6 7 8 9 10 54