ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्या चिनार खारकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे. आतापर्यंत त्यांनी “अवंतिका”, “ऊनपाऊस”, “भाग्यविधाता”, इत्यादी १५ हून अधिक मालिकांसाठी, तसेच १५ नाटकं, २० चित्रपट, आणि “सलाम ठाणे”, “झी गौरव”, “सलाम महाराष्ट्र” इत्यादी अनेक कार्यक्रमांचे संगीत संयोजन केलेले आहे. याचप्रमाणे आपण नेहमी पाहत असणार्या “केसरी टूर्स”, “वामन हरी पेठे सन्स” इत्यादी जाहिरातींचे संगीतही खारकर यांनीच दिले आहे.
खारकर यांचे ठाणे शहरासाठीही योगदान आहे. त्यांनी “मी मराठी” च्या “सलाम ठाणे” या कार्यक्रमासाठी संगीत दिले आहे. त्याचप्रमाणे ठाण्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असतो. भविष्यात ठाण्यात म्युझिक कम्पोझर्स कोर्स हा संगीत क्षेत्रात नव्याने येणार्या गुणवान नवोदितांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्याची त्यांची इच्छा आहे.
पुरस्कार : संगीतकार अनिल मोहिले आणि गझल गायक अनिरुद्ध जोशी यांच्याकडून संगीताचे धडे घेतलेल्या चिनार खारकर यांना “भिती” या नाटकासाठी उत्कृष्ट संगीत अल्फा मराठी या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
Leave a Reply