मुदगल, चिंतामणीसुत


मुक्तेश्वर उर्फ चिंतामणीसुत मुदगल

मुक्तेश्वर मुक्तेश्वर म्हणजे चिंतामणीसुत मुदगल.पंडिती परंपरेतील कवींमधे प्रथम मुक्तेश्वरांचा विचार करावा लागतो. १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात व १७ व्या शतकाच्या पूर्वार्धातील कलाकवी. संत एकनाथ यांच्या मुलीचा मुलगा अर्थात एकनाथांचा नातू होय. यांच्या जन्म, मृत्यू व गुरुपरंपरेबाबत संशोधकात मतभिन्नता आहे. मुक्तेश्वर हे त्यांच्या आराध्यदैवतचे नाव असून त्यालाच तो लीला विश्वंभर संबोधतो. मुक्तेश्वराचे गोत्र अत्री कोल्हापुरची महालक्ष्मी ही कुलदेवता. सोनारीचा भैरव हे कुलदैवत.
मुक्तेश्वरांनी विविध प्रकारच्या रचना केल्या. संत आणि पंडित यांच्यातील दुवा म्हणून मुक्तेश्वरांचे लेखन उल्लेखनीय आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*