अभिनेते दादा कोंडके

लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते

दादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या.

त्यांनी मराठी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.

दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत.

लागोपाठ ९ मराठी चित्रपटांच्या रौप्यमहोत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ त्यांच्या नावावर आजही शाबूत आहे.

जन्म :  ८ ऑगस्ट, इ.स. १९३२ ; नायगांव, मुंबई
मृत्यू : १४ मार्च, इ.स. १९९८ ; मुंबई

दाद कोंडके यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

बहुरंगी व्यक्तिमत्व कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके

दादा कोंडके

https://www.marathisrushti.com/articles/?p=81503

## Dada Kondke
## Kondke, Dada (Krishna Kondke)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*