दत्ता भट

दत्ता भटांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला.

दत्ता भट हे मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटच्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट हे गणपतराव बेलवरकरांच्या भूमिकेत होते. नटसम्राट मधील अप्पा बेलवलकर हे पात्र दत्ता भट यांनी अप्रतिम पणे केले. अत्यंत प्रभावी आवाज, अचूक शब्दफेक आणि पाठांतर. हृदयाला हात घालणारा अभिनय. ही भूमिका दत्ता भट अक्षरशः जगले. त्यानंतर प्रकृति‍ अस्वास्थ्यामुळे त्यांनी ती भूमिका सोडली. “सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे.

दत्ता भट यांच्या बद्दल वि.वा शिरवाडकर म्हणायचे, ” सोन्याला भट्टीत घालतात त्याचं दुःख होत नाही. ऐरणीवर ठोकतात त्याचं दुःख होत नाही. त्याचं दागिन्यात रुपांतर करताना सोन्याला मनस्वी यातना होतात त्याचंही दुःख त्याला होत नाही. पण जेव्हा त्याची तुलना गुंजेबरोबर केली जाते तेव्हा मात्र सोन्याला अपार दुःख होतं. भटांना गुंजेबरोबर तोलून घ्यायचं नव्हतं आणि नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांनी संघर्ष, विदूषक, नटसम्राट, भोवरा, भल्याकाका, मी जिंकलो मी हरलो, अखेरचा सवाल,बिऱ्हाड बाजलं, सूर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल, बॅरिस्टर अशा अनेक नाटकात भूमिका केल्या.

दत्ता भट यांचे ’झाले मृगजळ आता जलमय’ या नावाचे आत्मचरित्र ’ प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांचे ’जेथे जातो तेथे’ हे पुस्तकही आहे.

दत्ता भट यांचे १ एप्रिल १९८४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*