कापरेकर, दत्तात्रय रामचंद्र

 

(जन्म १९०५ मृत्यू १९८६)
विज्ञान व गणिताचे अध्यापन करणार्‍या कापरेकरांना बालपणापासूनच गणिताची गोडी लागल्यामुळे ते नाना प्रकारच्या कुतूहलजनक संख्या, त्यांचे गुणधर्म – आकृतिबंध शोधण्यात कायम गर्क असत. डोंबिवली-मुंबई प्रवासात त्यांना १६५, २७७९, २५९९७४ अशा डाव्या-उजव्या बाजूच्या अंकांची बेरीज मधल्या गटात वारंवार येणार्‍या अंकाइतकी असणारी ‘डेम्लोसंख्या’ सापडली. त्यांच्या ६१७४ या ‘कापरेकर स्थिरंका’वर
मार्टिन गार्डनरने अमेरिकन मंथलीत लिहिल्यामुळे त्यांची कीर्ती सातासमुद्रापार गेली. त्यांनी लिहिलेल्या ३०-३५ पुस्तिकांपैकी ‘थर्टिन कट्स’ आणि जादूचे चौरस चित्तवेधक आहेत. कापरेकरांच्या या करमणुकप्रधान गणिताचे अ. भा. गणिती परिषदातून चांगले स्वागत होत असे.

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*