मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.अभिनयाचा वारसा दया बाईंना घरातूनच मिळाला,त्यांची आत्या शांता मोडक या संगीत नाटकातील व जुन्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या.पण दयाजींनी आत्याच्या ओळखीचा कधीही शिडी म्हणून वापर केला नाही;सर्वात महत्त्वाचं म्हणजे दया डोंगरेंच्या घरातच अभिनयाचे वावडे नव्हते,कारण त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती तसंच त्यांचे पणजोबा हे कीर्तनकार होते.
अशा या दया डोंगरे गुणी कलाकाराचा जन्म ११ मार्च १९४० रोजी अमरावतीतल्या आपल्या आजोळी झाला.वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे काही काळ दया डोंगरेंना कर्नाटकातील धारवाड येथे शिक्षण घ्यावे लागले.काही काळाने त्या पुण्यात आल्या.आणि त्यानंतरचं शिक्षण मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालणातून पूर्ण केले. त्याच काळात दयाजींनी पुरुषोत्तम करंडक व एकांकिका स्पर्धाही गाजवल्या होता. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीतील “एनएसडी’मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण संसारीक जबाबदारी लवकर आल्यामुळे त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले होते. शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात दया डोंगरे काम करत .”तुझी माझी जोडी जमली रे”, “नांदा सौख्य भरे”,”याचसाठी केला होता अट्टहास”,”इडा पिडा टळो” यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. १९६९च्या सुमारास दया डोंगरे मुंबईत दाखल झाल्या आणि तिथून पुढे त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली. नाट्यमंदिर या संस्थेने विद्याधर पुंडलिकाचे “माता द्रौपदी’ हे नाटक रंगमंचावर आणले होते,या नाटकातील द्रौपदीची भूमिका विजया मेहता साकारत, तर गांधारीची भूमिकेत होत्या दया डोंगरे. या नाडकात दोन्ही अभिनेत्रींचा तडफदार अभिनय पाहण्यासारखाच होता असे. मात्र या नाटकाचे फारसे प्रयोग होऊ शकले नाहीत. पण त्यानंतर आलेल्या “लेकुरे उदंड झाली’ या नाटकाने दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खर्या अर्थाने कलाकार म्हणून ओळख मिळाली.
दया डोंगरे नावाची मुलगी पुढे जाऊन मोठी अभिनेत्री होईल असे त्यावेळी जर कुणी सांगितले असते तर ते खरे वाटले नसते. कारण शालेय जीवनात त्यांना अभ्यासातच रुची होती;शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ही बाब तेवढ्यापूर्तीच मर्यादीत होती. महाविद्यालयीन जीवनापासून दयाबाईंनी विशेष चमक दाखवण्यास सुरुवात केली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो.ग.रांगणेकर लिखित “रंभा’ या नाटकात त्यांनी इतका अप्रतिम अभिनय केला की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात आलेलं “संकेत मीलनाचा” हे परकीय संकल्पनेवरचे नाटकही गाजले.
दया डोंगरे नावाची मुलगी पुढे जाऊन मोठी अभिनेत्री होईल असे त्यावेळी जर कुणी सांगितले असते तर ते खरे वाटले नसते. कारण शालेय जीवनात त्यांना अभ्यासातच रुची होती;शाळेच्या स्नेहसंमेलनात देखील त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ही बाब तेवढ्यापूर्तीच मर्यादीत होती. महाविद्यालयीन जीवनापासून दयाबाईंनी विशेष चमक दाखवण्यास सुरुवात केली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो.ग.रांगणेकर लिखित “रंभा’ या नाटकात त्यांनी इतका अप्रतिम अभिनय केला की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले होते. त्यानंतरच्या काळात आलेलं “संकेत मिलनाचा” हे परकीय संकल्पनेवरचे नाटकही गाजले.
दया डोंगरे यांनी नाटक सुरू असतानाच दूरदर्शनवर काम करण्यास सुरूवात केली व अनेक हिंदी मालिकांमधून विविधांगी भुमिका साकारल्या.तिथूनपुढे मराठी चित्रपटात त्यांचं नावही सर्वश्रुत झालं;यामध्ये “मायबाप”चित्रपट असो, किंवा “उंबरठा”सारखा वेगळा चित्रपट, या सगळ्यात दयाबाईंच्या लहान-मोठ्या भूमिका लक्षात राहायच्याच.सचिन पिळगावकर दिग्दर्शित “आत्मविश्वास” चित्रपटात तर त्या आईच्या वेगळ्या भूमिकेत होत्याच, पण “नवरी मिळे नवऱ्याला”या चित्रपटातील करारी स्त्रीचे त्यांचे रूप आजही प्रेषकांच्या स्मरणात आहे. “खट्याळ सासू नाठाळ सून” या सदाबहार विनोदी चित्रपटातील त्यांनी साकारलेली सासूची मध्यवर्ती भूमिका रसिक कसे काय विसरतील? गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शित केलेल्या “स्वामी” मालिकेत त्यांनी माधवरावांच्या आईचे पात्र रंगवले, त्यातील त्यांचा करारीपणा अनेकांना भावला होता. नाटक चित्रपट आणि मालिका या सर्व माध्यमात दया डोंगरेंनी काम केलं,तरीपण त्यांचं पहिलं प्रेम होतं रंगभूमीच!”आश्रय”,”जुम्बीष” सारखे चित्रपट तर “मंतरलेली चैत्रवेल”,”संकेत मीलनाचा”, “चिं. सौ. कां. चंपा गोवेकर”,”अमानुष”, यासारख्या नाटकांमधून आपल्या अनोख्या अभिनयानं ७० तसचं ८० च्या दशकात दया डोंगरंनी रुपेरी पडदा तसंच रंगभुमीवर आपलं अनोखं स्थान निर्माण केलं वसंत कानेटकरांच्या “माणसाला डंख मातीचा’ या नाटकातत्यांनी सुप्रियाची भूमिका केली होती, इतकी अवघड भूमिका दयाजींनी प्रभावीपणे साकारली,की खुद्द कानेटकरांनी “माझ्या डोक्यातलं सुप्रियाचं पात्र तुम्ही सही सही उभं केलंत” अशी पावती दिली. दया डोंगरे यांना असा सन्मान अनेकदा मिळाला होता;कारण त्यांच्या अभिनयातच सशकत्ता होती.त्याशिवाय त्यांना “मायबाप” आणि “खट्याळ सासू नाठाळ सून” या चित्रपटांमधील व्यक्तीरेखेसाठी महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्काराने तर नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे.
(लेखन व संशोधन- सागर मालाडकर)
Khup chaan lekh aahe Daya Bainvar…mi laha astana tyanche serials baghaycho “Avhan” ani baki che Marathi serials…ani pictures hi kahi…mala tyancha abhinay farach avdaycha…nantar tyancha pattach anhi last mi tyana pahila “smita Talvalkar” chya funaral chya news madhye…Kuthe astat tya sadhya?any Idea Sagar Sir?