कुलकर्णी, दिलीप

एक शिस्तबद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अशी ओळख असणार्‍या दिलीप कुलकर्णी यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधुन चरित्रात्मक भुमिका साकारल्या आहेत.

नाटककार सुरेश खरे यांच्या “एका घरात होती” या नाटकाद्वारे त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. “बखर एका राजाची”, “अफलातून”, “घरोघरी” ही नाटके व “चौकट राजा”, “आक्रित”, “रात्र आरंभ” या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. ‘ओली’ या नाटकात त्यांनी शरीरभाषेचा केलेला वापर हा अभिनेता म्हणून एक आदर्श वस्तुपाठ होता.

संवेदनशील मनाच्या दिलीप कुलकर्णी यांना प्रत्येक गोष्ट चांगलीच झाली पाहिजे,याचा सतत ध्यास असे.”आपलं बुवा असं आहे!” ही त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात अप्रतिम भूमिका ठरली होती !

दिलीप कुलकर्णी हे सुप्रसिध्द अभिनेत्री निना कुलकर्णी यांच्यासोबत विवाहबध्द होऊन कलेचं आणि सहजीवन देखील तनमयतेने व्यतित केले . २२ डिसेंबर २००२ रोजी दिलीप कुलकर्णी यांचे मुंबईत निधन झाले.

दिलीप कुलकर्णी यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

अभिनेते व दिग्दर्शक दिलीप कुलकर्णी (26-Dec-2017)

अभिनेते व दिग्दर्शक दिलीप कुलकर्णी (22-Dec-2018)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*