ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत दिलीप पाडगावकर यांचा जन्म १ मे १९४४ रोजी झाला.
दिलीप पाडगावकर यांनी वयाच्या २४ वर्षी पत्रकारितेला सुरूवात केली होती. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्राची पदवी प्राप्त केली होती. पटकथा-दिग्दर्शन पदवीही त्यांनी मिळवली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्यांची पॅरिस प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती.
काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती. काश्मीरमधील सर्व घटकांशी विशेषत: तरुण आणि विद्यार्थ्यांशी सातत्याने, विनाअडथळा संवाद साधण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
दिलीप पाडगावकर यांचे २५ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply