ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर यांचा जन्म ४ मार्च १९६८ रोजी झाला.
दिनेश केळुसकर यांची तळकोकणातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून आपली ओळख आहे. दिनेश केळुसकर यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊनही आपण पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला. सुरवातीच्या काळात दिनेश केळुसकर यांनी वृत्तपत्रातील लिखाणाने आपण पत्रकारितेला केली.
बातमी छोटी असो अथवा मोठी तिचे सादरीकरण कसे करावे हे दिनेश केळुसकर यांच्या कडून युवा पत्रकारांनी शिकण्या सारखे आहे. मोठे राजकारणी असो अथवा भागातील गरीब शेतकरी त्यांच्याशी दिनेश केळुसकर हे आपुलकीने संवाद साधतात.
या निर्भिड पत्रकारितेचा गौरव म्हणून जानेवारी २०२० मध्ये त्यांना रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकार गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
Leave a Reply