ज्येष्ठ कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३२ रोजी झाला.
डॉ. दत्तात्रय सामंत उर्फ डॉ.दत्ता सामंत यांचा जन्म कोकणातील देवगडचा.त्यांचे वडील वैद्य व शेतकरी होते. ते आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि जडीबुटीच्या आधारावर लोकांचे उपचार करत. वडीलांना त्या कामात मदत करताना, दत्ता सामंत यांना डॉक्टरी पेशात रस निर्माण झाला आणि त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले व मुंबईत आपली प्रक्टिस चालू केली.
मजुरांच्या नेहमीच्या येण्याने व जगण्याचा संघर्षाला बघून तसेच त्यांचा पदरी अथक मेहनत करून देखील आलेल्या अठरा विश्वे दारिद्र्याला बघून डॉ.दत्ता सामंत व्यथित झाले होते.
डॉ.दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले. दत्ता सामंत यांनी अनेक विविध उद्योगात काम करणाऱ्या अश्या वेगवेगळ्या २०० कामगार संघटनांचे अध्यक्षपद आणि ५०० संघटनांचे उपाध्यक्षपद भूषवले होते.
गोदरेज पासून इतर गिरणी कामगारांचे नेतृत्व स्वीकारत दत्ता सामंत यांनी कामगारांचा एक मोठा मोर्चा मुंबईत काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी फायरिंग केली. त्यानंतर तो संघर्ष अजून चिघळला. यात ५० जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यात डॉ दत्ता सामंत यांचे पण नाव होते. परंतु दोनन वर्षांनी त्यांची सुटका करण्यात आली. ह्या घटनेमुळे दत्ता सामंत हे मुंबईच्या कामगार वर्तुळातले एक सर्वात मोठे नेतृत्व म्हणून उभे राहिले.
खासदार झाल्यावर देखील त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कामगारांचे प्रश्न मांडणे चालू ठेवले होते. त्यांनी सांसद म्हणून उत्कृष्ट कारकीर्द निभावली होती. पुढे जाऊन त्यांनी पुन्हा कामगार चळवळीच्या लढ्यात लक्ष घातले. १९९१ ला आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत पण त्यांनी कामगारांवर मोठे संकट कोसळले होते तेव्हा देखील दत्ता सामंतांनी लढा दिला होता. गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी ते लढत होते.
१६ जानेवारी १९९७ रोजी डॉ.दत्ता सामंत यांची गोळ्या झाडुन हत्या करण्यात आली.
Leave a Reply