डॉ. सौ. मंजिरी देव एक कथ्थक नृत्यांगना व गुरु असल्यामुळे, त्यांनी नृत्यविषयक भरपूर कार्य (सांस्कृतिक) केले आहे. उदा. ठाणे महानगरपालिकेच्या शाळअंमधून नृत्य शिकवणे, परीक्षक मगहणून काम करणे, आदरणीय कै.श्री.आनंद दिघे साहेबांच्या गणेश दर्शन स्पर्धेची १२ वर्षे परीक्षक, सोहळ्यांची कलादिग्दर्शक म्हणून काम केले आहे. संगीत महोत्सवाद्वारे पालकप्रेक्षकांची दृष्टी समृद्ध केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना (अंदाज ५ हजार) नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे व देत आहे.
डॉ.सौ. मंजिरी देव या ठाणे येथे विवाह करुन आल्यापासून(सन १९६८) नाट्य, नृत्य, अभिनय, संगीत क्षेत्रात आणि त्या अनुशंगाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली असून, त्यांनी स्वत:च्या संस्थांची निर्मिती करुन गेली ३५ वर्षे त्या कार्यरत आहेत. त्यांनी अनेक कलाकार घडविले आहेत.
पुरस्कार : अनेक संस्थांचे पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत. ठाणे गौरव, ठाणे नगररत्न, महाराष्ट्र शासनातर्फे अभियानाचे रौप्यपदक, उत्कृष्ट वाडम़यनिर्मिती पुरस्कार, रोटरीचा व्होकेशनल एक्सलंस पुरस्कार.
Leave a Reply