डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे एक प्रतिभावंत मराठी लेखक आहेत. त्यांच वास्तव्य हे परदेशात असून सध्या ते मराठी मंडळ या पिटसबर्ग या संस्थेसाठी लेखक म्हणुन काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या विपुल लेखनाला अमाप प्रसिध्दी मिळाली असून त्यांच्याभोवती गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिध्दीच एक वलयच निर्माण झालय. सातासमुद्रापल्याड, मराठीचा कलात्मक तसेच वैचारिक प्रसार व प्रचार करणारा हा गुणी कलाकार, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगळ्या व स्वतंत्र लेखनशैलीची रसिकांवर छाप पाडण्यात विलक्षण यशस्वी ठरला आहे लघुकथा हा जरी प्रियदर्शनांचा आवडता प्रांत असला तरी सांगितीक नाटकांच्या लेखना व सादरीकरणापासून ते विनोदी, मनोरंजन कथा लिहीण्यापर्यन्त सार्याच गोष्टी त्यांना उत्तम जमतात. संसार व्हर्जन 2 हा त्यांनी सादर केलेला अतिशय रंजक असा सांगितीक एकपात्री प्रयोग चांगलाच गाजला. त्यांनी लिहीलेल बहुतांशी साहित्य हे मराठी मंडळातर्फेच प्रकाशित केल जात. त्यांच्यामधील अष्टपैलु, काहीसा भावनाप्रधान पण तेवढाच मिश्कील असा लेखक वाचकांमध्ये चांगलाच रूजला असून त्यांच्या यशाच हेच तर गमक आहे.
” परतता घरा भिरी” , या त्यांनी लिहीलेल्या लघुकथेला, एकता लघुकथा निबंध स्पर्धेमध्ये ऑक्टोबर मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. ‘सिग्नल’ ही त्यांची दुसरी एक लघुकथा रंगदीप दिवाळी अंक 2010 महाराष्ट्र मंडळ या एन. वाय. मधील तसेच मराठी विश्व या एन. जे. मधील दोन मंडळांनी एकत्रितपणे प्रकाशित केलेल्या मासिकामध्ये ‘संपादकीय निवड’ या विशेष पुरस्कारास पात्र ठरली. विशिष्ठ पारंपारिक धाटणीच्या महिला व आताच्या नव्या आधुनिक महिला यांच्या स्वभावांमधील फरकांना मिश्कीलपणे आधोरेखित करणारी त्यांची नवीन बाईची कथा ही गोष्ट सुध्दा संवेदनशील वाचकांच्या मनात घर करून गेली. प्रियदर्शनांच्या कथांचा एकुणच रागरंग बघितला की वाचकांना कुठेतरी प्रगल्भ विचारांची दालने खुली करून देण्याचा त्यांचा प्रयास दिसून येतो. याशिवाय अपुर्वाइ ह्या मुंबई मधील प्रथितयश दिवाळी अंकासाठी लेखन, एकता व “बी. एम. एम.” या प्रकाशनांसाठी लेखन, मराठी मंडळाच्या गेल्या 25 वर्षांमधील स्वप्नवत वाटचालीवर व गौरवशाली एतिहासावर प्रकाश टाकणारा लेख ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांच पहिलं वहिलं पुस्तक कोल्हापूरमधल्या अजब पुस्तकालयाकडून प्रकाशित करण्यातं आलं ज्यात त्यांच्या सर्व गाजलेल्या 16 लघुकथांचा संग्रह करण्यात आला आहे. त्यातल्या अनेक कथांना भारत, अमेरिका, ऑष्ट्रेलिया, येथील ठिकठिकाणच्या लघु कथा स्पर्धांसाठी पारितोषिके देण्यात आली आहेत. प्रियदर्शन ह्यांच्या संगीत नाट्यसंभव या सांगितीक दुपात्री नाट्यलेखनाला व सादरीकरणाला रत्नागिरीमधल्या अत्यंत प्रतिष्ठीत अशा खल्वयन या संस्थेकडून दुसरे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
Leave a Reply