राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९५७ रोजी लातूर जिल्ह्यातील मेकगाव येथे झाला.
तात्याराव लहाने यांनी ‘कमवा व शिका’ या योजने अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून १९८१ मध्ये मेडिसीन क्षेत्रात पदवी घेतली.१९८५ मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी घेतली. त्यांनी आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून १२ ते १४ तास रुग्णालयात काम करत होते.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर ‘डॉ .तात्या लहाने अंगार’ हा चित्रपट काढण्यात आला आहे. या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांच्या जन्मापासून त्यांना पद्मश्री मिळेपर्यंतचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे. याची निर्मिती आणि दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले आहे.
Leave a Reply