MENU

गडवाल, (डॉ.) व्यंकटराव

वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी इंडियन अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथून जेनेटिक्स व प्लॅन्ट ब्रिडींग (जनुके व वृक्ष पुनरुज्जीवन) या विषयात पी.एच.डी. मिळवली. “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्‍या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती त्यांनी जगासमोर आणली.

१९९२ साली “हायब्रिड राईम्स” या विषयावरील परदेशातील तज्ञांसाठीचे सेमिनार प्रशिक्षकांचे कामही त्यांनी चोख बजावले. “अचिव्हिंग सेल्फ सार्फशिएंसी ईन ऑईल सिडस्” या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचे अमुल्य योगदान आहे. यापूर्वी “बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन (बीएमए) चे चेअरमन पद, एच.डी.एफ.सी. बॅंकेचे अध्यक्षपद २००२ ते २००५ साली इंडियन सोसायटी फॉर कॉटन इमप्रुव्हमेंट व अॅग्रीकल्चर कमिटी ऑफ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे प्रेसिडेंट पद ही त्यांनी भूषवले आहे.

१८९६ पासून ते रोटरी क्लब चे सक्रीय सभासद असून, रोटरी क्लबच्या जागतिक पोलिओ हटाओ मोहिमेत त्यांनी अमूल्य कामगिरी केली आहे व ही कामगिरी पूर्णत्वास नेली आहे. २००२ साली श्रीलंका येथे ३ एच कर्डाचे “साइट व्हिजीटर” म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

वैद्यक शास्त्रातील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना रोटरी क्लब तर्फे “बी एम ए बेस्ट” चे अरमन अॅवॉर्ड असे अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. त्याचप्रमाणे युनायटेड स्टेट एजन्सी जी जागतिक प्रगतीसाठी सतत कार्यरत असेल व ग्लॅक्सो लॅबोरेटोरिज, महाराष्ट्र हायब्रिड सिडस् कंपनी लि. (MAHYCO) चे ही सभासद ते यापूर्वी होते.

<!–

– डॉक्टर

गाव : हैद्राबाद

पत्ता: २/१०२, व्हिंबलडॉन पार्क, जे.के. स्कूल समोर, पोखरण रोड नं. १, ठाणे

कार्यक्षेत्र : अॅग्रीकल्चर सीड इंडस्ट्री

दूरध्वनी : २५३३५२८२

भ्रमणध्वनी : ९८९२७७५६०३

ई-मेल : venkatrao@gmail.com

–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*