जी. एन. जोशी

जी.एन. जोशी यांचा जन्म ६ एप्रिल १९०९ रोजी झाला. त्यांनी गायलेले रानारानात गेली बाई शीळ हे त्यांचे भावगीत हे मराठीतले पहिले भावगीत समजले जाते.

जी.एन. जोशी हे उच्चशिक्षित वकील होते. एचएमव्हीत रमाकांत रुपजी या वरिष्ठ अधिकार्‍याने जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचे अधिकारीच करून टाकले. जी.एन. जोशी, रमाकांत रुपजी व वसंतराव कामेरकर या अधिकार्‍यांच्या त्रयीने या भावगीतांच्या काळाला खरा आकार आणि आधार दिला. किती नव्या नव्या कलाकारांना त्यांनी हेरून प्रोत्साहन दिले व त्यांच्याकडून नेमकी रसिकांना आवडतील अशी गाणी करून घेतली त्याला तोडच नाही. शिवाय मराठी व हिंदी चित्रपटांच्या संगीताचे काम पुन्हा निराळे.

एच.एम.व्ही. त जी.एन. जोशी यांनी हे ४० वर्षे काम लीलया सांभाळले. त्या काळात कलाकारांना लोकांसमोर येण्यासाठी एचएमव्ही हे एकच मोठे व्यासपीठ होते. त्यामुळे जी.एन. जोशी हे एचएमव्हीतले दादा अधिकारी समजले जात. एच.एम,व्ही.त रमाकांत रूपजी या वरिष्ठ अधिकार्यां नी जोशी यांना प्रथम आणले व नंतर तर त्यांना मराठी व शास्त्रीय संगीताच्या विभागाचा अधिकार दिला.

१९३५ साली मराठीतल्या या पहिल्या भावगीताची ध्वनिमुद्रिका निघाली आणि महाराष्ट्राच्या घरांघरांत पोहोचली. तुफान खप असलेल्या या तबकडीमुळे एचएमव्हीचा मोठा आर्थिक फायदा झाला आणि जी.एन. जोशी यांचा एचएमव्हीत प्रवेश झाला. जी.एन. जोशी यांचे निधन २२ सप्टेंबर १९९४ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*