स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर.
माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. राष्ट* सभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन त्यांनी ‘जागृती’ नावाचे हस्तलिखित सुरू केले. त्याचे संपादन माडखोलकर करीत असत. ‘नवयुग’, ‘विविध ज्ञान विस्तार’ इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. ‘केशवसुतांचा संप्रदाय’ या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर ‘केसरी’त त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला. १९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे ‘आधुनिक कवी पंचक’ हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. ‘मुत्त*ात्मा’, ‘भंगलेले देऊळ‘, ‘शाप’, ‘कांता’, ‘दुहेरी जीवन’, ‘मुखवटे’, ‘नवे संसार’ या त्यांच्या गाजलेल्या कादंबर्या. ‘शुक्राचे चांदणे’, ‘रातराणीची फुले’ हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर ‘तरुण भारत’ चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर ‘संयुक्त महाराष्ट्राचा ठराव’ सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंबऱ्या, साहित्य समस्यांवरील लेख ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, ‘मी आणि माझे वाचक’ इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे.
अशा या ज्येष्ठ संपादकाचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.
गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
Leave a Reply