राजा नेने यांनी आपल्या कामाची सुरवात प्रभात फिल्म कंपनी पासून केली. त्यांचा जन्म १८ सप्टेंबर १९१२ रोजी झाला. व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला. रामशास्त्री अर्धा तयार झाल्यावर राजा नेने यांनी १९४३ नोव्हेंबरमध्ये प्रभात कंपनी सोडली.
राजा नेने यांचे निधन २१ फेब्रुवारी १९७५ रोजी झाले.
Leave a Reply