जहागीरदार, गजानन

२ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे जन्मलेले गजानन जहागीरदार हे मराठी व हिंदी भाषेतील चित्रपट-अभिनेते व दिग्दर्शक होते. गजानन जहागीरदार यांनी “रामशास्त्री“,“सिंहासन“, “पायाची दासी“,“वसंतसेना“, “वैजयंता“, “उमाजी नाईक“,“सुखाची सावली“, “दोन्ही घरचा पाहुणा” या मराठी चित्रपटातून तर; “होनहार“,“बेगुनाह”,“जेल यात्रा”,“ चरणों की दासी”, “किरण”, “बेहराम खान”, “महात्मा कबीर”, “ट्रॉली ड्रायव्हर”, “बंदर मेरा साथी”,“टॅक्सी स्टॅंड”,“विरहा की रात”,“धन्यवाद”

अश्या हिंदी सिनेमांमधून अभिनय व दिग्दर्शन देखील केले होते. तसंच “स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते.
१३ ऑगस्ट १९८८ या दिवशी गजानन जहागीरदार यांचे निधन झाले.
गजानन जहागिरदार यांचे मराठीसृष्टीवरील लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*