पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव. त्यांना ब्रिटीश राजवटीबद्दल एक प्रकारे चीड होती. बापूजींच्या चलेजाव चळवळीचे वेळी त्यांचे वय १६ वर्षे असताना त्यांनी शाळेवर बहिष्कार टाकणे, सभा घेणे वगैरे सरकार विरोधी वातावरण तयार करण्यांत आग्रक्रम राखला. त्यांच्या या कृत्यांची कुणकुण ब्रिटीश सरकारला लागल्यावरुन त्यांना १ महिना तुरुंगवासाची व १ महिना कोठडीची शिक्षा झाली. सुटून अल्यानंतरही त्यांचेवर पुन्हा पकडीचे वॉरंट होते म्हणून ते भूमिगत झाले.
स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात भाग घेतला नाही परंतु समाजकारण चालू ठेवले. सरकारी नोकरीतून सेवा निवृत्त झाले असताना त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या संघटनेमध्ये भाग घेतला. गेली २४ वर्षे ते स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून वयाच्या ८५ व्या वर्षीही काम करीत आहेत. ते पनवेल येथील चां.का.प्रभु श्री.लक्ष्मीनारायण मंदीर या संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त होते. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक सदस्य असून अजूनही त्या संघटनेत कार्यकर्ते म्हणून काम व मार्गदर्शन करीत आहेत.
Leave a Reply