गजेंद्र अहिरे

आपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.

गजेंद्र अहिरे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला.  त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर शिक्षण पुरे केले. त्यांनी कॉलेजमधील विविध कार्यक्रम, एकांकिका, नाटके यांमधून भाग घ्यायला सुरुवात केली. वर्षाला पाच-सहा एकांकिकांमधून कामं केल्याने त्यांना खूप अनुभव मिळाला. ‘आईचं घर उन्हाचं’ हे व्यावसायिक रंगभूमीवरील हे त्यांचे पहिलं नाटक.

शेवग्याच्या शेंगा, अनुमती, द सायलेन्स, अनवट, नॉट ओन्ली राउत,गुलमोहर, टुरिंग टॉकीज, पोस्टकार्ड, पिपाणी, निळकंठ मास्तर,शासन, विठ्ठ्लाच्या आळंदी-पंढरपूर वारीचे चित्रण करणारा “विठ्ठल विठ्ठल’ असे गजेंद्र अहिरे यांनी ३५ हून अधिक चित्रपट काढले आहेत.

गजेंद्र अहिरे हे कवी पण आहेत, त्यांनी सरीवर सरी कृष्णाकाठची मीरा, नॉट ओन्ली मिसेस राऊत, पांढर, सैल या चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. आणि पारितोषिकेही मिळाली.

मराठीतले चार दिग्दर्शक एकत्र येऊन चार लघुकथांवर आधारित ’बायोस्कोप’ हा चित्रपट आला होता. त्यांतली दिल एक नादान ही कथा गजेंद्र अहिरे यांची होती. एक ज्येष्ठ गायिका, आज एकाकी जीवन जगत आहे. त्यांच्याबरोबर साथीला आहे तो एक सारंगी वादक.

जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी ,दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट, मामी फिल्म फेस्टिवल, महाराष्ट्र राज्य पुरस्कारानंतर द सायलेन्स चित्रपट फ्रांसमध्ये दाखविला होता. हा सिनेमा त्या वर्षीच्या सगळ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकाला पात्र ठरला होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*