नाईक, गणेश

Ganesh Naik

सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद, पुढे युतीने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन ठाणे व नवीमुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ साली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध मंत्रीपद गणेश नाईक यांनी भुषविली आहेत. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक प्रथमत: खासदार म्हणुन निवडून आले.

त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या दुरदृष्टीमुळे वा माणसे ओळखण्याच्या त्यांच्या विलक्षण कसबामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांमध्ये भरणारी अशीच राहिली आहे. आपल्या कार्यकाळात नाईक यांनी जव्हार, मोखाडा, कल्याण, उल्हासनगर, पालघर, वसई, मिरा-भाईंदर, विक्रमगड, ठाणे शहर व नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी जनता दरबार आयोजित करून सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व असंख्य समस्यांना नाईक यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले होते.

कामगार मंत्री असताना अनेक गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, बालकामगारांचे पुनर्वसन, राज्यातील असंख्य सुरक्षा कामगारांना वेतन हमी, असंघटित कामगारांसाठी समान वेतनाची तरतुद, कंत्राटी कामगारांच्या समस्या अशा प्रकारचे कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. विशेष म्हणजे कामगार मंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन देण्याची तरतूद करून त्यांनी आपल्या देशापुढे माणुसकीचे अनोखे उदाहरण सादर केले होते. पर्यावरण व वनमंत्री असताना वन कर्मचार्‍यांना पाचवा वेतन आयोग लागू करणाचे, व वन्य जीवांपासून संरक्षण करण्याकरिता लागणारी शस्त्रे त्यांना पुरविण्याचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार झाले होते. तसेच उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर घातली होती. भूगर्भातील उष्णतेवर तयार करण्यात येणरा विद्युतप्रकल्प ठाणे जिल्ह्यात सर्वप्रथम उभारण्यात यावा हे त्यांचे स्वप्न त्यांच्या वेगळेपणाविषयी बरेच काही सांगून जाते.

गणेश नाईक यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नवीमुंबईचे महापौर सागर नाईक व आमदार संजीव नाईक हे चालवत आहे. नवीमुंबई म्हणजे नाईक मुंबई अशी ओळख निर्माण ते यशस्वी झाले असा सूर उपरोधक पणे तर कधी मिश्कीलरित्या माध्यामातुन किंवा जनतेतुन निघत असतो.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*