जेष्ठ किराणा घराण्याच्या गायिका गंगूबाई हनगळ यांचा जन्म.५ मार्च १९१३ रोजी झाला. “कन्नड कोकिळा” अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीच गाण छान गात असे.
गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे ‘गंगव्वा’ होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर ‘हनगल’ हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते.
सोळाव्या वर्षी त्यांचे श्री. गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३०-३२ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाईचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात सन १९५५ मध्ये पुरुषी झाला.
सवाई गंधर्वांकडे त्यांनी सांगिताचे शिक्षण घेतले. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वैगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता.
१९३२ साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली.
गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. २००३ साली त्यांनी आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी सांगितल्या. त्या ‘दि साँग ऑफ माय लाईफ’ नावाच्या पुस्तकात इंग्रजी व कानडी भाषेत प्रसिद्ध झाल्या आहेत.
२१ जुलै २००९ रोजी गंगूबाई हनगळ यांचे निधन झाले.
Leave a Reply