तेलवणे, गौरीनाथ नथुराम

तेलवणे, गौरीनाथ नथुराम

ठाण्यात संगीतक्षेत्रात काम करणारे अनेक दिग्गज कलाकार राहतात. यांतीलच एक प्रसिद्ध नाव म्हणजे ज्येष्ठ तबलावादक गौरीनाथ नथुराम तेलवणे हे होते. ठाण्यात ६५ वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणारे गौरीनाथ तेलवणे हे सन १९४८ पासून ठाणे महापालिकेत कार्यरत होते. महापालिकेत कार्यरत होते. महापालिकेच्या सर्व खात्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. ठाण्यातील जवळपास सर्व नगराध्यक्ष, महापौर, आयुक्त यांचे सहाय्यक (पी.ए.) म्हणून त्यांनी काम केले आहे.

लहानपणापासून संगीताची आवड असणार्‍या तेलवणे ह्यांनी मेळामध्ये गाणी म्हणणे, प्रभात फेर्‍यांत भाग घेणे, संगीत भजनी मंडळात गाणे तसेच मृदुंग वाजविणे यातून आपली संगीताची आवड जोपासली. पुढे त्यांनी तबल्याचे रीतसर शिक्षण घेतलं. तबल्याचे शिक्षण त्यांनी अनेक दिग्गजांकडून घेतले आहे. ज्यात पं. श्री. नारायणराव इंदूरकर, पं. विनायकराव घांग्रेकर, पं. लालजी गोखले, पं. नारायण जोशी (डोंबिवली), तसेच छोटे खॉं साहेब राजकोट यांचा समावेश होतो. तेलवणे ह्यांनी आतापर्यंत अनेक बुजूर्ग गायकांची साथ केली आहे. ज्यामध्ये पं. हरिभाऊ घांगरेकर, पं. गजाननराव जोशी, पं. बेहरेबुवा, पं. राम मराठे, पं. शरद साठे, पं. शरद अरोलकर, पं. फिरोज दस्तूर, पं. बसवराज राजगुरु, पं. गिडे, पं. यशवंतबुवा जोशी इत्यादी दिग्गजांचा समावेश होतो. ठाण्यात १९७८ साली झालल्या रंगायतनच्या उद्घाटन सोहळ्याची, सांस्कृतिक कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली होती. तसेच १९८५-८६ साली महापालिकेतर्फे झालेल्या संगीत महोत्सवाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. आजही ते अनेक विद्यार्थ्यांना तबला वादनासाठी विद्यादान करत आहेत.

पुरस्कार : आतापर्यंत त्यांना ठाणे भूषण (२००२), स्वा. सावरकर स्फूर्ती पुरस्कार (२००६), ठाणे, कलारत्न (२००८) इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*