असं म्हणतात की ज्या मातीत आपण जन्माला येतो त्या मातीशी आपली जोडली गेलेली नाळ कधीच तुटत नाही. अगदी सातासमुद्रापलीकडे राहूनसुध्दा आपल्याला आपली संस्कृती, तत्वे, आपली भाषा साद घालत असते. परंतु काही कौटुंबिक जबाबदार्यांमुळे म्हणा किंवा व्यावसायिक ओझ्यांमुळे म्हणा पण आपल्याला मायदेशी परतणे शक्य नसते. मग तिथेच राहून आपापल्या परीने भाषासंवर्धनाचा, संस्कृतीप्रसाराचा प्रयत्न सुरू होतो. पिटसबर्ग मधील अशाच काही मराठी तरूणांनी मराठी अस्मिता, बाणा, व हितसंबंध जोपासण्यासाठी व सर्व मराठी कलावंताना, प्रतिभावंतांना हक्काच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी मंडळाची स्थापना केली व आज अनेक मराठी जगतातील (परदेशांमधील) हिरे या संस्थेबरोबर कायमचे जोडले गेले आहेत. गिरीष ठक्कर हे याच मराठी मंडळाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले आहेत.
याआधी २००७ ते २००९ या कालावधीमध्ये त्यांनी व त्यांच्या संघाने फिलाडेलफिया येथे बृहन् मुंबई मराठी मंडळ आयोजित करण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पेलून दाखविली होती. त्यामुळे त्यांचा व्यवस्थापकीय कामांमधील अनुभव मोठा दांडगा आहे. गिरीष ठक्कर हे गेली १६ वर्षे मराठी माणसाच्या सेवेसाठी तत्पर आहेत. ते बी. एम. एम. च्या (बृहन् मुंबई मराठी मंडळ) कार्यकारी समिती मध्येही १९९३ ते १९९७ दरम्यान कार्यरत होते.
Leave a Reply