मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या “अमरभूपाळी” या चित्रपटात होनाजी बाळाची भूमिका गोविंद पंतांनी साकारली होती. तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर “घनः श्याम सुंदरा” या गाण्यावर आपल्या पहाडी स्वरांचे साज चढवून ही भूपाळी अविस्मरणीय केली. भावमधुर आवाज, तल्लीनता, हे त्यांच्या गायनातील उल्लेखनीय गुण होते.
Leave a Reply