जी. ए. कुलकर्णी हे मराठी लेखक, कथाकार होते. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म १० जुलै, १९२३ रोजी झाला. त्यांचे बहुतेक आयुष्य धारवाड येथे गेले. त्यांनी धारवाडच्या जे. एस. एस. महाविद्यालयामध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. ते वैयक्तिक आयुष्यात अबोल व प्रसिद्धीविन्मुख मानले जातात. त्यांचे निधन ११ डिसेंबर, १९८७ रोजी झाले.
माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट्राला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण याच गावी झाले. माध्यमिक शिक्षण बेळगाव येथे झाले तर १९३९ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. लिगराज महाविद्यालयातून १९४३ साली त्यांनी बी. ए. ची पदवी मिळवली. इंग्रजी विषयात एम. ए. केल्यानंतर काही काळ मुंबईला सरकारी खात्यात नोकरी केली. त्यानंतर धारवाड येथील जनता महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते अध्यापन करू लागले.
१९४० च्या आसपास त्यांनी कथा लेखन सुरू केले. सत्यकथेतून त्यांच्या कथा प्रसिद्ध होऊ लागल्या आणि कथाकार म्हणून जी. ए. यांचा लोकांना परिचय झाला. ‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘काजळमाया’, ‘रमलखुणा’, ‘सांजशकुन’, ‘पिगळावेळ’, ‘कुसुमगुंजा’, ‘आकाशफुले’, ‘सोनपावले’ इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. जी. एं. च्या काही कथा या मराठी कथेतील शिखरेच आहेत. रूपककथा या कथा प्रकारालाही जी. ए. यांनी खूपच उंचीवर नेऊन ठेवले. ‘बखर बिम्मची’, ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’, ‘ओंजळधारा’, ‘अमृतफळे’ हे बालसाहित्य आणि कुमारसाहित्य संग्रह प्रसिद्ध आहेत. या व्यतिरित्त* त्यांचे अनुवादित साहित्यही बरेच आहे.
जी. एं. चा पत्रप्रपंच सुद्धा दोन खंडात प्रसिद्ध झालेला आहे. अशा या गूढ साहित्य लेखकाचे ११ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
जी. ए. कुलकर्णी यांचे मराठीसृष्टीवरील लेख
मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. (11-Dec-2017)
मराठी लेखक, कथाकार गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जी. ए. (3-Nov-2019)
मराठी लेखक जी. ए. कुलकर्णी (10-Jul-2017)
## Gurunath Abaji alias G A Kulkarni
Hi ,
Today (16 June 20) i hear on Pune Radio about GA Kulkarni.. it is good to know all about.
Best Regards,
Madahvraj