हेमंत देसाई हे गेली जवळपास ३६ वर्षं पत्रकारितेत आहेत. मराठी दैनिकात आर्थिक पत्रकारितेचा अध्याय सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात ज्येष्ठ सहायक संपादक म्हणून, तसंच महाराष्ट्र टाइम्स मध्ये एकूण २६ वर्षं काम केले. या काळात सदर वृत्तपत्राच्या जडणघडणीत महत्त्वाचा योगदान असून अग्रलेख, वैचारिक लेखनशैलीसाठी ख्याती आहे.
त्याचप्रमाणे लोकमत,सकाळ, महानगर, प्रभात, नवशक्ति, महानगर सारख्या वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन ही केलेलं आहे.तर साधना साप्ताहिकात चार वर्षे सदर व अग्रलेखही लिहिले. तसेच बाबू मोशाय या टोपणनावाने चित्रपटविषयक लिखाण. संशोधन, अभ्यासू वृत्ती हेमंत देसाईंच्या वैशिष्ट्य म्हणता येईल.कोणत्याही प्रकारची भीडभाड न ठेवता परखड लेखन व बोलण्यासाठी प्रसिद्ध. आक्रमक व वैचारिकता यांची सांगड घालून लेखन व भाषणे राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्नांवर लेखनाबरेबरच ठिकठिकाणी व्याख्याने. राजकीय व सामाजिक विषयांचे अभ्यासक म्हणून व वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानमालांमधून व्याख्याने दिली आहेत यामध्ये पुण्याची वसंत व्याख्यानमाला, संगमनेरची अनंत फंदी, मिरज व गडहिंग्लज येथील वाचनालयांच्या व्याख्यानमाला या व इतर ब-याच ठिकाणी व्याख्याने दिली असून, अनेक टीव्ही चॅनेल्सवरूनही विश्लेषणात्मक चर्चांमधून सहभाग घेतला आहे. बऱ्याच स्वयंसेवी संस्थांशी संबंध. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी जवळचे नाते जोडून काम. विविधांगी लेखनासोबतच कथालेखनही चालू. भोवळ कादंबरीही दिवाळी अंकातून प्रकाशित झाली असून ती पुस्तकरूपात प्रसिध्द झाली आहे. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमांसाठी अध्यापन ही केलं असून माध्यम क्षेत्रातील त्यांचे अनेक विद्यार्थी आज महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
‘सण्डे के सण्डे’ , ‘बोई बगाल’ , ‘ जलसाघर’ , ‘ तारकांचे गाणे ‘ , ‘ शहेनशहा अमिताभ ‘, ‘ विदूषक ‘, ‘ चांदरात ‘ ही बाबू मोशायलिखित आणि आपला अर्थसंकल्प, कंगालांचे अर्थशास्त्र व सारथी ही हेमंत देसाई नावाने लिहिलेली पुस्तके प्रकाशित. त्यांचा ‘बोई बंगाल’ या पुस्तकास राज्य वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला असून,आणखीही काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर. चित्रपटसंगीतविषयक ‘सुहाना सफर’ व राजकीय लेखसंग्रह ‘डावपेच’ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.
Humble request Shri. Hemant Desai sir, please provide e-mail address to pass some political message to you at SHREE MUKTESHWAR DEVALAYA, JUHU. Pure one side game at Charity Commissioner’s office. It is highly required a person like Shri. Tukaram Munde as Charity Commissioner. My name is Ashok Jukar from Juhu, Moble :9867173868.
राजकारण बदलत आहे..माणसिकता काय आहे….पक्षाला कोणत्या तुम्ही सावरता.,अन् कोणाला दुखावता माहीत आहे त्यामुळे कुणाच्या धाकात…दालवणीला न राहता लोकशाही ने ऊत्तर द्या….चालत्या गाडीत बसने बंद करा.:-
हेमंत sir
सध्या मी वाट पाहत आहे तुमचा latest video ची विशेष करून ताब्लिगी जमात या प्रकरणाबाबत चे सत्य
लोकसत्ता मध्ये आजच्या लेखाबद्दल तुमचं मत काय माफ करा माझी ओळख सांगायची राहून गेली मी सतीश शिंदे मुंबई आपले सगळे videos follow करतो
हेमंत देसाई आपला मो.नंबर किंवा ईमेल एड्रेस कृपया कळवावा जेणेकरुन आपल्याला सविस्तर बोलता येईल. संदीप बन्सोड,नागपुर.
?????