इंदिराबाई हळबे

समाजसेविका

इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य आले, त्यातून सावरत असतानाच त्यांना अपत्य वियोगाचे दुखही पेलावे लागले. मात्र या धक्क्यातून खचून न जाता आपली मुलगी मीनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला. आपल्या एकाकी आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंदिराबाई हळबे यांनी देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून रूग्णसेविकेसारखा खडतर कोर्स पूर्ण केला.

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी ‘मातृमंदिर’ ही संस्था स्थापली.

इंदिराबाई हळबे यांच्यावरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

# Halabe, Indirabai

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*