जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

लेखक

लेखक जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद यांचा जन्म १५ मे १९४३ रोजी झाला.

शांतीच्या शोधात असलेल्या असंख्य भारतीयांना साद घालणाऱ्या नर्मदा परिक्रमेचे अचंबित करणारे अनुभव साध्या सोप्या भाषेत शब्दबद्ध करणारे लेखक जगन्नाथ कुंटे, तथा स्वामी अवधूतानंद हे ‘नर्मदे हर हर’ या पुस्तकामुळे प्रकाशात आले. कुंटे यांनी एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा खडतर नर्मदा परिक्रमा केली होती.

आसक्ती-वासनांचा त्याग करून शांतीच्या शोधातील या यात्रेकरूने आध्यात्मिक लेखनाची वेगळीच शैली विकसित केली. त्यांचा जन्म कऱ्हाडमधील. अध्यात्माची ओढ लहानपणापासूनची. कतारमधील ‘गल्फ टाइम्स’मध्ये काही वर्षे नोकरी करून मायभूमीत परतल्यानंतर सुरू झाली त्यांची आगळी वेगळी शोधयात्रा. नर्मदेची साद आली, आणि ते परिक्रमेस निघाले.

त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.

अध्यात्म आणि बुवाबाजी यांच्यात ते फरक करीत. बुवाबाजीवर त्यांनी सतत प्रहार केला. ‘अध्यात्म म्हणजे जीवनाचा विकास,’ असे ते मानत असले, तरी नर्मदा परिक्रमेमध्ये एकीकडे प्रसिद्ध महंतांच्या वागण्यातील फोलपणा आणि दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या कार्याविषयी सहृदयताही कुंटे यांच्या लेखनातून प्रकटली आहे.

जगन्नाथ कुंटे यांचे ४ मार्च २०२१ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*